सांखळी परिसरातील प्रतिष्ठित नागरीकांनी मित्र-मंत्रिणींना दिल्या शुभेच्छा
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात शहर तसेच ग्रामीण भागात नाताळ सण मोटय़ा उत्सहात साजरा करण्यात आला, या निमित्त ख्रिस्ती बांधवांनी घरात विधुत रोषणाई केली होती, आणि येशु जन्म देखावा केला होता, घरा समोर स्टार, कंदिल लावण्यात आला आहे, यामुळे परिसरात उत्सहाही वातावरण पाहायला मिळले.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सर्व नागरिकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. याचबरोबर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष राजेश सावळ,राया पार्सेकर, यशवंत माडकर, सुभाष फोंडेकर,गुरुप्रसाद नाईक, राजू नाईक ,चंद्रकांत घाडी, माजी आमदार प्रताप गावस, कालिदास गावस, प्रवीण ब्लेगन, मनोजकुमार घाडी, प्रियेश डांगी, महेश गवंडे, मनोहर वळवईकर, जगा गावकर इत्यादी सांखळीतील प्रतिष्ठित नागरिकांनी मतदारसंघातिल ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा दिल्या.
पाळी, वेळगे, सुर्ल,आणि सांखळी शहर परिसरात जास्त खिस्ती बांधव राहात असून या परिसरात 24 पासून विविध कार्यक्रम ,धर्म प्रार्थना, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यास चांगला प्रतिसाद लाभला .