ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांना ‘सर विन्स्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्ड’ने गौरविले आहे. तसेच संकटकाळातील दोघांच्या नेतृत्वाची तुलना केली आहे. जॉन्सन यांच्या लंडन येथील कार्यालयात झालेल्या एक सोहळय़ादरम्यान व्हिडिओ लिंकद्वारे हा पुरस्कार स्वीकारला आहे. या सोहळय़ात चर्चिल यांच्या कुटुंबाचे सदस्य, युक्रेनचे राजदूत वॅदिम प्रिस्तेको आणि ब्रिटनमध्ये सैन्य प्रशिक्षण घेतलेले युक्रेनियन नागरिक सामील झाले.
1940 मध्ये चर्चिल यांनी ज्याप्रकारे स्वतःच्या पद्धतीने नेतृत्वाच्या कसोटीला तोंड दिले, त्याचप्रकारे झेलेंस्की यांनी संकटाच्या या घडीला स्वतःची नेतृत्वक्षमता दाखवून दिल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे. तर झेलेंस्की यांनी जॉन्सन तसेच ब्रिटनचे त्यांच्या सहकार्यासाठी आभार मानले आहेत. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यावर कीव्हचा दौरा करणारे जॉन्सन हे पहिले पाश्चिमात्य नेते होते.