वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू होणाऱया टाटा पुरस्कृत महाराष्ट्र खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत क्रोएशियाचा टॉप सीडेड टेनिसपटू मॅरीन सिलिकला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. या स्पर्धेत 15 वषीय मानस धामणेला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
पाचव्या टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पात्र फेरीला शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. क्रोएशियाचा टॉप सीडेड सिलिक याला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत स्पर्धा आयोजकांनी पुढे चाल दिली आहे. त्याचप्रमाणे गेल्यावषी या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविणारा ईमिल रुसुव्होरी, बोटिक झेंडस्कल्प आणि सेबेस्टियन बायेझ यांनाही पुढे चाल मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांना पहिल्या फेरीतच परस्पराविरुद्ध लढावे लागेल. बोपण्णा आणि झेंडस्कल्प तसेच रामकुमार रामनाथन आणि मेक्सिकोचा व्हॅरेला हे दुहेरीत एकत्र खेळणार आहेत. भारताचा नवोदित टेनिसपटू 15 वषीय मानस धामणेला पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.