प्रतिनिधी / बेळगाव : पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बेळगावमधील नागाfरकांना हसविण्यासाठी रॅम्बो सर्कस पुन्हा एकदा बेळगावमध्ये दाखल झाली आहे. गोवावेस येथे अग्निशमन विभागाच्या कार्यालयासामेर खुल्या जागेत सर्कसचा तंबू घालण्यात येत आहे. यामुळे जोकरच्या गंमती जंमती, जादूचे खेळ, कुत्रा, ससा, पोपट यांच्या कवायती पाहता येणार आहेत.
यापूर्वी सीपीएड मैदानावर रेम्बो सर्कस आली होती. त्यावेळी बेळगावमधील नागाfरकांनी या सर्कसला तुफान प्रतिसाद दिला होता. त्याच काळात जेमिनी सर्कस देखील बेळगावमध्ये आले होते. परंतु त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे सर्कस आले नव्हते. आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर सर्कस पुन्हा दाखल झाले आहे.
येत्या काहि दिवसात गणेशोत्सव असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्कस बेळगावमध्ये आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागाfरकांना सर्कसचा आनंद घेता येईल. सर्कसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन कवायती, जोकरच्या गंमती जंमतींचा समावेश करण्यात आला आहे. पुर्वीच्या काळी जंगली प्राण्यांचाहि सर्कसमध्ये समावेश असायचा परंतु सरकारच्या नियमानुसार जंगली प्राण्यांचे खेळ थांबविण्यात आले.
3 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या दरम्यान सर्कस बेळगावमध्ये असणार असून, दररोज 3 शो होणार आहेत. दुपारी 1, सायंकाळी 4 व 7 वाजता असे 3 शो होणार आहेत. काऊंटरवर तसेच ऑनलाईन देखील तिकिट बुकींग केले जात आहे.