सावंतवाडी / प्रतिनिधी-
अमृत महोत्सव निमित्त आरोस ग्रामपंचायतीत माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, दशावतारी कलाकार यांचा शाल ,श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शंकर नाईक , उपसरपंच सरिता नाईक , ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, ग्रामसेवक संतोष जाधव आदी उपस्थित होते.