Tarun Bharat

नागरिकांची बैठक रद्द नव्हे, लांबणीवर

मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम यांचे स्पष्टीकरण : नवीन तारखेची लवकरच घोषणा

प्रतिनिधी /मडगाव

नागरिकांकडून सल्ले वा सूचना घेण्यासाठी गेल्या सोमवारी बोलाविण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आलेली नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे. नगराध्यक्ष लिंडन पेरेरा व आपण मिळून या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता, असे स्पष्टीकरण मुख्याधिकारी रोहित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे. या बैठकीची नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आपणास सचिवालयातील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जावे लागल्याने शेवटच्या क्षणी ही बैठक रद्द करावी लागली. त्यामुळे बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागल्याने आपणास त्याची खंत आहे. पुढील दोन-तीन आठवडय़ांनंतर ही बैठक घेतली जाईल. नगरसेवकांचा व आमदारांचा या बैठकीला विरोध होता ही अफवा असून नगरसेवक व दोन्ही आमदार त्यास राजी आहेत आणि आपण शहरासाठी राबवत असलेल्या उपक्रमांना त्यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे, असा दावा कदम यांनी यावेळी केला.

नगराध्यक्ष पडले उघडे

नगराध्यक्ष व आपण मिळून ही बैठक बोलाविली होती, असा दावा कदम यांनी केल्याने नगराध्यक्ष पेरेरा उघडे पडले आहेत. कारण सदर बैठक रद्द झाल्यानंतर पत्रकारांनी पेरेरा यांची प्रतिक्रिया जाणली असता, आपणास या बैठकीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, आपण वालंकिणी वारीवर होतो, असे त्यांनी सांगितले होते. तसेच नगरसेवकांना या बैठकीबद्दल विश्वासात न घेतल्याने कित्येक नगरसेवकांनी आपल्यापाशी नाराजी व्यक्त केली असल्याचे पेरेरा यांनी सांगितले होते.

Related Stories

शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

GAURESH SATTARKAR

तानावडेंना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ

Amit Kulkarni

काणकोण तालुक्यात वादळी वाऱयाच्या तडाख्याने हानी

Amit Kulkarni

श्री इस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण देवालयात उदक शांती पूजा

Amit Kulkarni

कतारहून गोव्यात 279 हवाई प्रवासी दाखल, देशांतर्गंत प्रवासात 182 प्रवाशांचे आगमन व 339 प्रवाशांचे प्रयाण

Omkar B

सिंधू, सायना चांगल्या कामगिरीसाठी सज्ज

Patil_p