Tarun Bharat

दुचाकीतील पेट्रोल चोरीच्या प्रकारांना कंग्राळी बुद्रुकमधील नागरिक वैतागले

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

आपल्या घरासमोर पार्क केलेल्या दुचाकी वाहनांतील पेट्रोल चोरण्याच्या प्रकारांना ऊत आला आहे. रोजच्या पेट्रोल चोरीमुळे नागरिक वैतागून गेले आहेत. कंग्राळी बुद्रुक-शास्त्रीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर हा चोरीचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. काकती पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी रात्रीची गस्त वाढवून अशा चोऱयांना त्वरित आळा घालून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

येथील माध्यमिक विद्यालय ते यमनापूरकडे जाणाऱया मुख्य रस्त्यावर आपल्या घरांसमोर पार्क केलेल्या दुचाकी वाहनांतील पेट्रोल चोरीचे प्रकार वाढत असल्याचे या परिसरातील नागरिकांतून सांगण्यात येत आहे.

पेट्रोल चोरीमुळे अनेकांच्या कामाच्या नियोजनाचा खेळखंडोबा

नागरिक दुसरे दिवशीच्या कामाचे नियोजन करून आदले दिवशीच आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून आणतात. ठरल्याप्रमाणे आपल्या कामावर किंवा गावाला जाण्यासाठी सकाळी गाडी चालू करताच वाहन सुरू होत नाही. असे का होत आहे म्हणून पेट्रोल तपासल्यावर ते चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. यामुळे ठरविलेल्या नियोजनावर पाणी फेरते. पुन्हा पेट्रोल पंपावर चालत जाऊन पेट्रोलसाठी पुन्हा पैसे मोजावे लागत आहेत.

नागरिकांनीच शहाणे होणे गरजेचे

रात्रीच्या वेळेस पेट्रोल चोरी करणाऱया चोरटय़ांना पकडून पोलिसांच्या हवाली करणे आता नागरिकांच्याच हाती आहे. नागरिकांनीच आता शहाणे होऊन रात्रीची गस्त स्वतःच घालून पेट्रोल चोरी करणाऱया चोरटय़ांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सावधगिरीने पाळत ठेऊन पेट्रोल चोरटय़ांना पकडून शिक्षा केल्यास पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Related Stories

पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

tarunbharat

भंडारी, चिटणीस, ज्ञानमंदिर, सेंट जॉन संघांना विजेतेपद

Amit Kulkarni

पुरुषांच्या निराश्रीत केंद्रात महिलांना प्रवेश

Amit Kulkarni

दर्शनचा पराभव करून बुफा इंडिपेंडंट चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

जन्म-मृत्यूची माहिती ऑनलाईनऐवजी नागरिकांच्या हाती!

Amit Kulkarni

मैला काढण्यासाठी व्यक्तीचा वापर करणे गंभीर बाब

Amit Kulkarni