Tarun Bharat

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

शहापूरमधील व्यावसायिकांतून नाराजी : सिंगल फेजवर व्यवसाय कसा चालवायचा?

प्रतिनिधी /बेळगाव

गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी केली जात असताना दुसरीकडे विजेचा लपंडाव सुरू आहे. दोन दिवसांपासून शहापूर परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिक वैतागले आहेत. व्यवसाय करण्यासाठीच्या काळातही वीज नसल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर, ज्युनिअर इंजिनिअर यांना फोन करूनही त्यांच्याकडून योग्य उत्तरे दिली जात नसल्याने दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे, असे कारण दाखवून पूर्वसूचना न देताच वीज काढली जात आहे. विजेवरच अनेक उद्योग अवलंबून असतात. वीज नसली की काम थांबवावे लागत असल्याने उद्योग आर्थिक अडचणीत सापडत आहेत. शहापूर येथील नाथ पै सर्कल येथे विजेचा लपंडाव हा पाचवीलाच पुजलेला आहे. गणेशोत्सव असल्याने खरेदीची धामधूम सुरू आहे. परंतु विजेअभावी कामगारांना काम थांबवावे लागत आहे.

सोमवारी सकाळपासून शहापूर-खासबाग मार्गावर सिंगल फेज वीज घालण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील विजेवर अवलंबून असणारे सर्वच व्यवसाय ठप्प होते.

गणेशोत्सवात दुरुस्तीचा स्टंट

बेळगावमध्ये मोठय़ा उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यामुळे कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना हेस्कॉमकडून दुरुस्तीसाठी स्टंटबाजी केली जात आहे. दुरुस्ती करायचीच होती तर गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Related Stories

टिप्परची धडक बसून 54 बकऱ्या ठार

Tousif Mujawar

म्हणे तुम्ही येथे समस्या मांडू नका

Patil_p

विंटेज विमानाचे बेळगावमध्ये दर्शन

Amit Kulkarni

आता बेळगाव मधून चेन्नईला थेट विमानसेवा

Patil_p

मंगळवारी टिळकवाडीच्या या भागात होणार वीजपुरवठा खंडीत

Tousif Mujawar

बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

Amit Kulkarni