खोतीगाव काणकोण येथील लोकोत्सवास गोव्यातील जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पेडणे
खोतीगाव काणकोण येथे होणाऱया लोकोत्सव माध्यमातून संपूर्ण देशवासीयांना आमच्या गोव्याची संस्कृतीचे , कलेचे आणि संचिताचे दर्शन होणार असून या लोकोत्सवात पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी तसेच गोव्यातील जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित राहून हा लोकोत्सव यशस्वी करुया असे आवाहन सभापती रमेश तडवडकर यांनी पेडणे येथे केले
पेडणे तालुक्मयातील लोकांना लोकोत्सवाचे निमंञण देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात साभापती रमेश तडवडकर बोलत होते. या यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांदे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर , भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास, काणकोण भाजप मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकोत्सवात दोन लाख लोकांची उपस्थितीचे लक्ष
यावेळी पुढे बोलताना सभापती रमेश तडवडकर म्हणाले या लोकोत्सवात गोवा राज्यातून आणि देशाच्या विविध भागातून दोन लाख नागरिक उपस्थित राहणार असून त्यादृष्टीने आयोजकांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले. गोव्याची लोककला, खाद्यसंस्कृती , जीवनशैली, राहणीमान शेती उत्पादन, गाठठी भाज्या, ग्रामीण भागाचे दर्शन, विविध कला हे दाखवण्याचा प्रयोजन असून काणकोण येथे होणाऱया या लोकोत्सवाच्या माध्यमातून दोन लाख लोक देशभरातून आणि गोवा राज्यातून सहभागी होणार असून त्या दृष्टीने आयोजन करण्यात येणार असल्याचे तडवडकर यांनी सांगितले.
गेली 21 वर्ष काणकोण येथे आम्ही लोकउत्सवाच्या माध्यमातून आमची संस्कृती, आमची कला’ आमचं जीवन जनतेला दाखवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आता यापुढे जाऊन दरवषी वाढता आलेख लक्षात घेता यंदा संपूर्ण देशासाठी हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
देशाच्या विविध भागातून तसेच गैगोवा राज्यातील सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहणार असल्याने या सर्व नागरिकांची सोय त्या ठिकाणी करण्यात येणार असून यावेळी त्यांच्या निवासाची तशीच भोजनाची व्यवस्था या भागातील हॉटेल्सचे मालक, रेस्टॉरंट विविध आस्थापने यांनी स्वतः उचलली असून त्यांनी ही सोय मोफत करण्याचे आश्वासन आयोजकांना दिले आहे. या लोकोत्सवाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती मृर्मू यांच्या हस्ते होणार असून यासाठी हा लोकोत्सव आम्हा गोव्यातील जनतेसाठी विशेष आहे असे सांगितले.
हा लोकोत्सव आयोजित करुन पेडणे तालुक्मयातील जानतेला निमंञण दिल्या बद्दल धन्यवाद दिले.व या लोकोत्सवात पेडणे तालुक्मयातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावून लोकसंस्कृतीचे दर्शन घ्यावे असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.
सभापती रमेश तडवडकर हे गैगेली 21 वर्षे आयोजित करत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.व या लोकोत्सवात पेडणे तालुक्मयातील नागारिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन हा लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार जीत आरोलकर यांनी केले. पुष्पगुच्छ नगरसेवक विष्णू साळगावकर यांनी केले तर आभार किसन फडते याःनी मानले.