शहरात येण्यासाठी वाहनधारकांना घालावा लागतोय वळसा : बॅरिकेड्स हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध चौकात होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ट्रफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र ही सुविधा बंद ठेवून बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रकार रहदारी पोलीस प्रशासनाने चालविला आहे. त्यामुळे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा समादेवी गल्लीत येणारा रस्ता वाहनधारकांसाठी बंद झाला आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी वळसा घालून यावे लागत आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना वाहनधारकांसाठी मात्र गैरसोयीचे ठरत आहे. विविध चौकात होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रहदारी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध चौकात ट्रफिक सिग्नल सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र ही टॅफिक सिग्नल सुविधा कार्यान्वित झाली नसल्याने डॉ. राजेंद्र प्रसाद चौक, धर्मवीर संभाजी चौक, गोगटे चौक, आरटीओ सर्कल आदी ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे. पण रहदारी पोलिसांची नियुक्ती केवळ दंडात्मक कारवाईसाठी करण्यात येत असल्याने चौकात रहदारी पोलीस नसतात. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. राजेंद्रप्रसाद चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहराच्या पश्चिम भागातील नागरिक बेळगाव-वेंगुर्ला मार्गाने शहरात प्रवेश करीत असतात. त्यामुळे हा रस्ता आणि राजेंद्र प्रसाद चौक वर्दळीचा बनला आहे. त्यामुळे राजेंद्र प्रसाद चौकात रहदारी पोलिसांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. पण या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी बॅरिकेड्स लावून वाहनधारकांसाठी रस्ता बंद करण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱया वाहनधारकांची गैरसोय होत आहे. राजेंद प्रसाद चौकात होणाऱया वाहतूक कोंडीवर नियंत्रण करण्यास रहदारी पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. हे अपयश लपविण्यासाठी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्याचा पर्याय राबविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सदर चौकात रहदारी पोलिसांची नियुक्ती करून रस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
समादेवी गल्लीत तसेच किर्लोस्कर रोडला जाण्यासाठी पश्चिम भागातून येणाऱया वाहनधारकांना लिंगराज कॉलेज समोरून वळसा घालून जावे लागत आहे. तसेच शहरातून पश्चिम भागातील गावांना आणि राणी चन्नम्मा चौकाकडे जाण्यासाठी वाहनधारकांना धर्मवीर संभाजी चौकाला वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे हा प्रकार वाहनधारकांसाठी तापदायक ठरत आहे. येथील बॅरिकेड्समुळे काकेत कळसा आणि गावाला वळसा, अशी स्थिती वाहनधारकांची बनली आहे. त्यामुळे रहदारी पोलीस विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष घालून राजेंद्र प्रसाद चौकातील बॅरिकेड्स हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.