तरुण भारत

मनपाने हटविले शहरातील होर्डिंग्ज

विधानपरिषद निवडणुकीचे कारण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव महानगरपालिकेने शहरातील होर्डिंग हटविण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेचे कारण देत शहरातील राजकीय होर्डिंग हटविले जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी शहरातील मुख्य मार्गांवरील होर्डिंग हटविले.

काही दिवसांपूर्वीच जगद्ज्योती बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहरात मोठय़ा प्रमाणात विविध संघ-संस्थांनी, राजकीय व्यक्तींनी बॅनर लावले होते. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. यामुळे बेळगावसह परिसरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या नियमावलीनुसार महानगरपालिकेचे कर्मचारी राजकीय होर्डिंग हटवत आहेत.

Related Stories

किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत

Omkar B

वडगाव येथे मटका अड्डय़ावर छापा

Rohan_P

खासगी कुरिअरला पोस्टाची टक्कर

Amit Kulkarni

मनपा निवडणुकीबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल

Patil_p

शिवबसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजमध्ये वृक्षारोपण

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवड 12 रोजी?

Amit Kulkarni
error: Content is protected !!