तरुण भारत

कराची शहर पुन्हा हादरले

वृत्तसंस्था/ कराची

पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीला लक्ष्य केले आहे. कराचीच्या युनायटेड बेकरीनजीक आयईडी स्फोट घडविण्यात आला असून यात एका नागरिकाचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत.

Advertisements

स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने परिसरातील वाहनांना आग लागली आहे. याचबरोबर तेथील अपार्टमेंट, दुकाने आणि वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. कुठल्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

एका दुचाकीत आयईडी पेरून हा स्फोट घडवून आणला गेल्याचे प्रारंभिक तपासात आढळून आले आहे. या स्फेटामुळे एका 25 वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला असून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती शहराचे पोलीस महासंचालक मुश्ताक अहमद महरी यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी याप्रकरणी विस्तृत अहवाल मागविला आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्यात एक बळी गेल्याने दुःख व्यक्त केले आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारसोबत मिळून काम करू असे शरीफ म्हणाले. तर राष्ट्रीय सरकार या प्रकरणी तपासासाठी सिंध सरकारला पूर्ण मदत करणार असल्याचे पाकिस्तानचे मंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानात मागील काही काळात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. 15 दिवसांपूर्वी कराची विद्यापीठात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 3 चिनी प्राध्यापिकांचा समावेश होता. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. पाक सरकारला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, बलूच लिबरेशन आर्मी, आयएसआयएस खुरासानला तोंड द्यावे लागत आहे. तर अफगाणिस्तान सीमेवर तालिबान त्याच्यासाठी आव्हान ठरला आहे.

Related Stories

रशियाकडून क्लस्टर बॉम्बचा वापर

Patil_p

फायझरची लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला महिनाभरातच कोरोना

datta jadhav

पुतीन यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा मृत्यू

Patil_p

रशियात वाढतोय पुतीन यांना विरोध

Patil_p

तुर्कस्थानातील भूकंपात 20 ठार

Patil_p

रशियाशी संघर्षासाठी युक्रेनला अनेक देशांकडून शस्त्रे

Patil_p
error: Content is protected !!