Tarun Bharat

शहरातील सिग्नल पुन्हा कार्यरत

गोवावेस, शहापूर, कॅम्प येथील सिग्नल सुरू : वाहनधारकांतून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील वाढत्या वाहतूक केंडीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच ठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करणे शक्मय नाही. तसेच उपनगरीय भागात वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून सिग्नल कार्यरत झाले असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काहीप्रमाणात कमी झाली आहे.

शहरातील गोवावेस सर्कल, शहापूर येथील शिवाजी उद्यान कॉर्नर, कॅम्प येथील ग्लोब थिएटर कॉर्नर या परिसरात सिग्नल पुन्हा कार्यरत करण्यात आले. गोवावेस येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखीची ठरत होती. यामुळे वाहनचालकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत होता. शहापूर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या महात्मा फुले रोडवरून अवजड वाहने येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. ती कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले होते. परंतु ते कार्यान्वित करण्यात आले नव्हते.

अखेर हे सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. यामुळे रहदारी पोलिसांचे काम थोडेसे कमी झाले आहे. परंतु गोवावेस, गोगटे सर्कल त्यानंतर ग्लोब सर्कल येथील सिग्नल पार करून येण्यास बराच कालावधी जात असल्याने प्रवासासाठी काही वेळ आधीच प्रवाशांना घराबाहेर पडावे लागत आहे.

Related Stories

भक्तिमार्गातून जीवन सार्थकी बनवा

Amit Kulkarni

1080 शाळांना एनजीओंकडून मध्यान्ह आहार

Amit Kulkarni

संबरगी ग्राम पंचायतीत गैरव्यवहार

Patil_p

मतमोजणीसाठी साडेसातशे कर्मचाऱयांची कोरोना चाचणी

Amit Kulkarni

कुलवळ्ळीसह 9 गावांच्या शेतकऱयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Amit Kulkarni

जिल्हास्तरीय विद्याभारती क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

Amit Kulkarni