Tarun Bharat

‘ज्ञानवापी’त शिवलिंग सापडल्याचा दावा

न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने संबंधित जागा तत्काळ केली सील

वाराणसी / वृत्तसंस्था

Advertisements

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण करणाऱया पथकाला आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. यासंबंधी माहिती सर्वदूर झाल्यानंतर न्यायालयाने शिवलिंग सापडलेले ठिकाण तात्काळ सील करण्याचे आदेश दिले. तेथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाऊ नये, असे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंटला दिले आहेत. सर्वेक्षण झालेल्या ठिकाणाचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाने या यंत्रणांवर टाकली आहे.

वाराणसीतील ज्ञानवापी कॅम्पसचे सर्वेक्षण सोमवारी तिसऱया दिवशी पूर्ण झाले. वादी-प्रतिवादी पक्षातील 52 जणांचे पथक वकील-आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सकाळी 8 वाजता आवारात दाखल झाले. साडेदहाच्या सुमारास सर्वेक्षण संपले. गेल्या तीन दिवसांपासून ज्ञानवापी मंदिर परिसरात शिवलिंगाचा शोध घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले जात होते. सोमवारी तिसऱया दिवशी सर्वेक्षण झालेल्या भागात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. यासंबंधी आता मंगळवारी दिवाणी न्यायाधीश वरि÷ विभाग रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयाला माहिती दिली जाणार आहे. मात्र, सविस्तर अहवाल तयार करण्यास वेळ लागू शकतो, असे वकिलांचे म्हणणे आहे. आयोगाला 15 दिवसांत कृती अहवाल तयार करायचा आहे. त्यानुसार निर्धारित वेळेत न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आयुक्त अजयकुमार मिश्रा म्हणाले. तर “बाबांचा नंदी सापडला; ज्याची ते वाट पाहत होते. इतिहासकारांनी जे लिहिले ते बरोबर आहे. बाबा भेटताच आत ‘हर हर महादेव’ची गर्जना झाली,’’ असे हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल यांनी स्पष्ट केले.

सर्वेक्षण आणि पाहणीसाठी नियुक्त करण्यात आलेले पथक तिसऱया दिवशी ज्ञानवापी येथे गेले. या पथकाने तेथे शिवलिंग पाहिल्याचे सांगितले. सर्वेक्षण पथकात समाविष्ट हिंदू बाजूचे वकील हरिशंकर जैन यांनी तातडीने वाराणसी न्यायालयात अर्ज केला. यामध्ये शिवलिंग तेथे सापडल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्याने सीआरपीएफ कमांडंटला जागा सील करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. वरि÷ विभागीय न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी जिल्हाधिकाऱयांना तातडीने जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत.

‘बाबा’ सापडले ः हिंदू पक्षकार

सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल यांनी बाहेर येऊन मोठा दावा केला आहे. आतमध्ये ‘बाबा’ सापडले आहेत. ज्याचा आपण शोध घेत होतो ते अखेर सापडले. शिवलिंगासोबतच अन्य बरेच काही सापडले आहे, असे ते म्हणाले. आता 75 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 15 फूट उंच असलेल्या पश्चिमेकडील भिंतीजवळील ढिगाऱयांमुळे त्याच्या सर्वेक्षणाची मागणी जोर धरणार आहे.

कारंजांना संबांधले शिवलिंग ः मुस्लीम पक्षकार

सर्वेक्षण केल्यानंतर बाहेर आलेल्या मुस्लीम बाजूच्या वकिलाने हिंदू बाजूचे दावे फेटाळून लावले आहेत. शिवलिंग वगैरे काहीही आढळले नाही. उद्या, 17 मे रोजी न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे, असे मुस्लीम पक्षकाराच्या वकिलाने सांगितले. तर, ज्ञानवापी मशिदीच्या वाळूखानामध्ये एक कारंजी आहे. जी रचना शिवलिंग म्हणून सांगितली जात आहे तीच कारंजी आहे. इतर सर्व दावे खोटे आहेत. मशिदीच्या वरच्या भागात नमाज अदा केली जाते, असे शृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरणाचे प्रतिवादी अंजुमन इनाजानिया मस्जिद कमिटीचे वकील रईस अहमद अन्सारी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

न्यायालयाने घाईघाईने हा आदेश दिल्याचे वकील रईस अहमद अन्सारी यांनी सांगितले. न्यायालयाच्या या आदेशावर आम्ही समाधानी नसून याला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. मस्जिद समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मुस्लीम पक्षाच्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंजुमन इनाजानिया मस्जिद समितीने वाराणसी न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी यावर सुनावणी होणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान काय घडले….

माहिती लीक केल्यामुळे पथकातील एका व्यक्तीला हटवले

सर्वेक्षणाअंती मुख्यमंत्र्यांनी गृह सचिवांकडून घेतली माहिती

ज्ञानवापीतील चित्रीकरण केलेल्या भागाचे संशोधन करणार

ज्ञानवापीच्या 500 मीटर परिसरात सार्वजनिक प्रवेशास बंदी

चारही बाजूंनी येणाऱया रस्त्यांवर पोलीस-पीएसीचे संरक्षण

सर्वेक्षणाच्या तिसऱया दिवशी ज्ञानवापीच्या सुरक्षेत मोठी वाढ

Related Stories

‘दीदी-ओ-दीदी’ टिप्पणीमुळे महिला नाराज

Patil_p

सीबीएसईचे 2022 साठी नवे धोरण घोषित

Patil_p

रावण दहन नव्हे रावण पूजन करणारे मंदिर

Patil_p

कायदामंत्र्यांनाच ट्विटरचा दणका

Amit Kulkarni

झारखंडमध्ये ‘बंद’वेळी नक्षलवाद्यांचा हैदोस

Patil_p

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना, 10 जण ठार

Patil_p
error: Content is protected !!