वृत्तसंस्था / अहमदाबाद
अहमदाबाद येथील पक्षाच्या कार्यालयावर पोलिसांकडून अवैध स्वरुपात छापा टाकण्यात आल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा आम आदमी पक्षाने सोमवारी केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या छाप्यासंबंधी प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्यास पुरावे दाखवू असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. तर गुजरात पोलिसांनी आप कार्यालयावर कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आप प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी कुठल्याही वॉरंटशिवाय दोन तासांपर्यंत पक्ष कार्यालयाची झडती घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलीस पथकाने सर्व संगणक, पक्ष कार्यालयातील दस्तऐवजांची पडताळणी केल्याचे भारद्वाज यांनी म्हटले आहे.