3-4 दहशतवादी लपल्याची शक्यता
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिह्यातील बसंतगडमध्ये बुधवारी सलग चकमक झाल्याचे उधमपूर रियासी रेंजचे डीआयजी रईस मोहम्मद भट यांनी सांगितले. 3-4 दहशतवाद्यांचा एक गट जंगल परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना घेरल्यानंतर गोळीबार झाला. बुधवारी दिवसभर या भागात शोधमोहीम सुरू होती. दहशतवादी जंगलभागात लपल्यामुळे त्यांना शोधण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे. गुप्तचर विभागाकडून दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे पथक बसंतगडच्या पाथी नाला खानेड भागात शोधमोहीम राबवत होते. दहशतवाद्यांपासून असलेला धोका लक्षात घेऊन या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले होते