Tarun Bharat

यल्लम्मा देवस्थान परिसराची स्वच्छता करा

प्रतिनिधी /बेळगाव

सौंदत्ती येथील यल्लम्मा डेंगरावरील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. सर्वत्र कचरा व दुर्गंधी पसरल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच देवीला देण्यात येणाऱया देणगीमध्येही मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. तेव्हा त्याची चौकशीही करावी, या मागणीसाठी देवस्की महिला व जय भीम ओमसाई संघटनेच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

जिल्हय़ातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱया यल्लम्मा डोंगरावर सर्वत्र अस्वच्छता आढळून येत आहे. मोठय़ा संख्येने भाविक ये-जा करतात. या भाविकांसाठी कोणत्याच सुविधा नाहीत. कचऱयाचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तेंव्हा तातडीने तेथील स्वच्छता करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. श्री रेणुका देवी जागृत देवस्थान असल्यामुळे भाविक मोठय़ा भक्तीने देणगी देतात. मात्र त्या देणगीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही या निवेदनाद्वारे केला आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन दिले.  

यावेळी राजू ठोंबरे, श्रीकांत ठोंबरे, रुपा आर. ठोंबरे, सुशिला चौगुला, बसाप्पा हुलीयर, निलाप्पा निंगापुरी, दौपदा बिलावर, काशाप्पा अनेन्नावर यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : कौमार्य चाचणीत अपयश, दोघी बहिणींना पाठवले माहेरी

Archana Banage

डीसीपी विक्रम आमटे यांच्याकडून धावपटू प्रेम बुरुडचे कौतुक

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्य़ात शुक्रवारी आणखी 148 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Patil_p

स्मार्ट बसथांब्यांवरील गाळे देणार भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 21 केंद्रांवर पार पडली ‘नीट’ परीक्षा

Patil_p

आदर्श मराठी विद्या मंदिर शाळेला दुहेरी मुकूट

Amit Kulkarni