Tarun Bharat

कुर्टी-फोंडा येथे ट्रकच्या धडकेत क्लिनर ठार

हेन्डब्रॅक निकामी झाल्याने क्लिनर ठार

प्रतिनिधी /फोंडा

दीपनगर-कुर्टी येथे एका पार्क करून ठेवलेला मालवाहू ट्रक अचानक उतरणीवर खाली आल्याने पुढे चालणारा क्लिनर अन्य एका ट्रकच्या मधोमध कचाटय़ात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अलोयसीस थॉमस (21,मूळ केरळ) असे त्याचे नाव आहे. सदर घटना काल मंगळवारी पहाटे 6 वा. सुमारास घडली. दुर्देवी घटनेत हेन्डब्रेक निकामी झाल्याने आपल्याच ट्रकच्या क्लिनरचा जीव गमावावा लागल्याने चालकावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपनगर कुर्टी येथे रत्याच्या शेजारी काही ट्रक पार्क करून ठेवण्यात आले होते. त्याचवेळी मयत क्लिनर असलेला केएल 13 के 7356 मालवाहू ट्रक पार्किगसाठी आला. जाग शोधण्यासाठी चालकाने केवळ 4 मिटर अंतरावर इंजिन बंद केले व हेन्ड ब्रेक ओडून तो खाली उतरला त्यानंतर क्लिनरही खाली उतरला व ट्रकच्या पुढे चालू लागला. यावेळी अचानक ट्रकने गती घेतली व दुसऱया पार्क केलेल्या ट्रकच्या मधोमध क्लिनरसह धडकला व त्याचा जागीच मृत्यू झाला.  फोंडा येथील उपजिल्हा ईस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. ट्रकचालक नियाज व्ही. याला फेंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे.  

Related Stories

भाजपा किमान 27 जागा जिंकणार पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढू !

Amit Kulkarni

कोरोना रुग्णांच्या मतदानावरुन कर्मचाऱयांत घबराट

Omkar B

डिचोली तालुक्मयातील ग्रामीण भागात देवीपूजन उत्साहात

Amit Kulkarni

सांगेत ऊस उत्पादकांचे उद्यापासून धरणे आंदोलन

GAURESH SATTARKAR

दूधसागर ऑनलाईन बुकिंगसाठी जीईएलच्या वेबसाईटला विरोध

Amit Kulkarni

ताळगांव येथे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन

Omkar B