अर्चना बनगे,प्रतिनिधी
Pigeons Pooping On Balcony : घराची बाल्कनी सुंदर असावी, बाल्कनीत फुलांची झाडे असावीत आणि सायंकाळी हा नजारा डोळ्यात भरुन चहा घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. पण काही ठिकाणी कबुतर इतका त्रास देत असतात की बाल्कनी आणि घरांच्या खिडक्या खुल्या ठेवायची इच्छा होत नाही. यामुळे श्वसनाचे आजार देखील होवू शकतात. तुम्हालाही या त्रासापासून सुटका हवी असेल तर आज आम्ही ट्रिक्स सांगणार आहोत याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.
बाल्कनीत जुनी सीडी ठेवा
कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही घरातील वापरात नसणारी सीडी ठेवा किंवा एखादी चमकणारी वस्तू ठेवा. चमकणाऱ्या वस्तुपासून कबुतरांना त्रास होतो यामुळे अशा ठिकाणी ते येत नाहीत त्यामुळे तुमचाही त्रास कमी होईल.
व्हिनेगरचा वापर करा
कबूतरांना पळवून लावण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता.कबूतरांना व्हिनेगरचा वास आवडत नाही त्यामुळे ते तुमच्या बाल्कनीत येणार नाहीत.यासाठी २-३ चमचे व्हिनेगर,थोडासा बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिक्स करुन हे पाणी बाल्कनीत शिंपडा. कबुतर येणार नाहीत
वाइनमध्ये दालचिनी मिसळा
कबूतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखण्यासाठी वाइनचा वापर देखील करता येतो.यासाठी वाइनमध्ये थोडी दालचिनी पावडर मिक्स करून ज्या ठिकाणी कबूतर येतात त्या ठिकाणी या पाण्याचा फवारा सतत मारल्याने कबुतर येण्यापासून बंद होतील.या टिप्सचा वापर करा आणि कबुतर मुक्त बाल्कनीचा आनंद घ्या.

