नोकरी सोडून ‘सफाई कर्मचारी’ झाली कॅटरिना
जॉब सोडून एक महिला जगभरात फिरून गलिच्छ घरांची मोफत सफाई करत आहे. ही महिला स्वतःला ‘क्वीन ऑफ क्लीनिंग’ म्हणवून घेतेय. दोन दिवसांमध्ये घराची सफाई करत त्याला चमकवून देण्याचे काम ती करत आहे. 29 वर्षीय कॅटरिना औरी फिनलंडची रहिवासी आहे. सफाई करणे मला अत्यंत आवडते, याचमळे मी नोकरी सोडून जगभरात फिरून सफाई करत असल्याचे ती सांगते. सफाईशी निगडित सूचना देखील ती शेअर करते. टिकटॉकवर तिचे 78 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे कॅटरिनाला प्रायोजक मिळाला आहे. सफाईच्या व्हिडिओतून प्राप्त होणाऱया कमाईतून तिच्या प्रवासाचा खर्च निघून जात आहे. कॅटरिना ज्या लोकांच्या घरात साफसफाई करते, त्यांच्याकडून एक पैसाही आकारत नाही.
मी अस्वच्छतेला घाबरत नाही, तर अस्वच्छता मला घाबरत असल्याचे कॅटरिनाने म्हटले आहे. साफसफाईचे किट परिधान करून कॅटरिना दोन दिवसांमध्ये पूर्ण घर साफ करून देते. क्लीनिंग करियची सुरुवात तिने प्रथम तीन मुलांची आई असलेल्या घराची सफाई करून केली होती. घर साफ झाल्यावर या महिलेने कॅटरिनाचे आभार मानले होते, तर मुलांकडून प्रेमाची वागणूक मिळाली होती. प्रारंभी कॅटरिनाचा प्रवास अन् क्लीनिंगचा खर्च प्रत्येक व्हिजिटमागे 24 हजार रुपयांच्या आसपास येत होता.
अशी होते कमाई
कॅटरिनाने मागील वर्षी स्वतःची नोकरी सोडली, त्यानंतर तिने पूर्ण लक्ष क्लीनिंग कारकीर्दीकडेच केंद्रीत केले आहे. क्लीनिंग उत्पादनांच्या प्रायोजकत्वातून कॅटरिनाला मोठी कमाई प्राप्त होते. साफ-सफाई करतानाचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सफाई करताना डिश सोप, ओवन क्लीनकर आणि स्क्रबचा वापर करते. तर क्लीनिंग टूल किटमध्ये स्क्रॅपर, डिश ब्रश, डस्टर, मायक्रोफायबर क्लॉथ, स्क्रब डॅडीचा स्पंज सामील आहे.