Tarun Bharat

सेरेना विल्यम्सचे निवृत्तीचे स्पष्ट संकेत

Advertisements

न्यूयॉर्क / वृत्तसंस्था

अमेरिकेची 23 वेळची ग्रँडस्लॅम विजेती सेरेना विल्यम्सने मंगळवारी आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले. या महिन्यात मी 41 वर्षांची होईन आणि आता काही अन्य बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता मला जाणवत आहे, असे ती याप्रसंगी म्हणाली. टेनिस इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असणारी सेरेना विल्यम्स या आठवडय़ात टोरँन्टो येथे हार्ड कोर्ट स्पर्धेत खेळत असून यंदाची अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा आपल्यासाठी शेवटची ठरु शकते, असे ती म्हणते. यंदाची ग्रँडस्लॅम स्पर्धा दि. 29 ऑगस्टपासून न्यूयॉर्क येथे खेळवली जाणार आहे. सेरेनाला 2021 विम्बल्डन स्पर्धेतील पहिल्या फेरीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर एक वर्ष बाहेर रहावे लागले होते. यंदा जूनमध्ये ऑल इंग्लंड क्लबवर विम्बल्डनमध्ये पुनरागमन केले असले तरी त्यात ती पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.

Related Stories

मनोज दशरथनचा पलानीवर विजय

Patil_p

इंग्लंड कसोटी संघाची घोषणा

Patil_p

विराटकडे ना ख्रिस गेलची ताकद, ना एबीडीची क्षमता!

Patil_p

विराट, रोहितचे वनडेतील स्थान कायम

Patil_p

कोलकाता-हैदराबाद आज चुरशीचा सामना

Amit Kulkarni

वनडे मानांकनात पाकने भारताला टाकले मागे

Patil_p
error: Content is protected !!