Tarun Bharat

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांविरोधात क्लोजर रिपोर्ट

पुणे / वार्ताहर :

Closure report against Rashmi Shukla in phone tapping case काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हय़ात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. याला पुणे पोलिसांनीदेखील दुजोरा दिला आहे.  

राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस उपायुक्ताची कसून चौकशी केली. संबंधित पोलीस अधिकऱ्याचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे. काँग्रेसचे नाना पटोले तसेच बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हय़ाचा तपास गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू होता. याप्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्ला या पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकऱ्याचीही चौकशी करण्यात आली होती. त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता. या वेळी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेने फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणत्या स्वरुपाची माहिती गोळा केली या आणि अशा स्वरुपाची माहिती यावेळी घेण्यात आली. याबाबतही चौकशी करण्यात आली होती.  

असा झाला होता गुन्हा दाखल…   

शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदा टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून फोन टॅपिंग केल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Stories

सातारा पालिकेची तब्बल 7 महिने सर्वसाधारण सभाच नाही

Patil_p

”भाजपचे सर्व आरोप निराधार व खोटे”

Archana Banage

कोल्हापूर : कबनूरात कोरोना बाधितांचे अर्धशतक पार

Archana Banage

कोरोनाबरोबर आपले युद्ध सुरू; या युद्धात मास्क हीच आपली ढाल : मुख्यमंत्री

Tousif Mujawar

स्वाभिमानीचा बिल्ला राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधला का..!

Archana Banage

Karnataka : लिंगायत धर्मगुरू शिवमूर्तीवर पोस्को कायद्यांतर्गत दुसरा गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!