Tarun Bharat

गोंदियातील बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; मुख्यमंत्र्यांची माहिती

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मदतीचे आश्वासन देऊन ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना गोंदिया-भंडाऱ्यात (Bhandara-Gondiya Gang Rape) घडली आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महिलेवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत एसआयटीमार्फत (SIT) याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथे घडलेले हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे. त्यामुळे संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. यापुढे असे कोणीही धाडस करणार नाही असे कठोर शासन आरोपींना व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हलगर्जीपणा य याप्रकरणात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहे.

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यासाठी वारलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पीडितेची प्रकृती बिकट असून नागपूरमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर अटक आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे घटना?
पतीपासून विभक्त झालेली पीडित महिला गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्री बहिणीचे घर सोडले. गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जात असताना, घरी सोडण्याच्या बहाण्याने एकाने तिला कारमध्ये बसवले. मात्र, त्याने तिला घरी न सोडता दोन दिवस तिच्यावर अत्याचार केले. नंतर पळसगावच्या जंगलात सोडून त्याने पळ काढला.

पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्याच्या कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या एकाने घरी सोडण्याच्या बहाण्याने पीडितेवर अत्याचार केले. नंतर त्याने दुसऱ्या दिवशी त्याने मित्रासह तिच्यावर अत्याचार केले. कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Stories

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4 पोलिसांचा मृत्यू; आणखी 132 कोरोनाबाधित

Rohan_P

गडचिरोलीत नक्षलवादी-पोलिसांमध्ये चकमक,दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

Abhijeet Shinde

‘एमबीबीएस-फायनल’चे विद्यार्थी कोविड सेवेत ?

Patil_p

जयसिंगपूरच्या मुख्याधिकारी व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर विश्वास

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये मूक आंदोलन: संभाजीराजे कार्यकर्त्यांवर संतापले

Abhijeet Shinde

‘त्या’ दोन मेडिकल स्टोअर विरोधात तक्रार दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!