Tarun Bharat

आमदार संतोष बांगरांचा पीकविमा कार्यालयात राडा; अधिकाऱ्यांनाही केली शिवीगाळ

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Shinde Group MLA Santosh Bangar : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी काही दिवसांपूर्वी एका उपहारगृह व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. याचे राज्यभर पडसाद उमटले होते. ही घटना ताजी असताना आता त्यानंतर त्यांनी हिंगोलीतील पीकविमा कार्यालय फोडल्यानं ते पुन्हा वादात अडकले आहेत. त्यामुळं आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संतोष बांगर यांनी हिंगोली येथील कृषी विभागात राडा घातला असून कार्यालयाची तोडफोड केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत शिवराळ भाषेत झापलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळं हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून आमदार संतोष बांगर हे शेतकऱ्यांसह त्यांच्या समर्थकांना घेऊन हिंगोलीतील पीकविमा कार्यालयात आले होते. त्यावेळी कार्यालयात कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यानं आमदार बांगर यांनी काही वेळ अधिकाऱ्यांची वाट पाहिली. परंतु त्यानंतरही कुणी न आल्यानं त्यांचा पारा चढला. त्यानंतर आमदार बांगर यांनी त्यांच्या समर्थकांसह पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी माध्यान्ह भोजनासाठी खाद्यसामग्री घेऊन जाणाऱ्या वाहनांचा ताफा अडवून बांगर यांनी भोजनाच्या मेनूची तपासणी केली होती. त्यात अळ्या सापडल्याचा दावा करत बांगर यांनी अधिकाऱ्यांचा चांगलंच सुनावलं होतं. याशिवाय काही महिन्यांपूर्वी हिंगोलीतील एका उपहारगृहात निकृष्ट दर्जाचं अन्न सापडल्यानं आमदार संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळंही मोठा वाद झाला होता.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसात २७० पॉझिटिव्ह, तिघांचा बळी

Archana Banage

पाकचे 8 सैनिक ठार; बंकर्स, लाँच पॅड्सही उध्वस्त

datta jadhav

सातारा : मोराच्या शिकारीप्रकरणी दोघांना अटक

Archana Banage

… मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत! : भाजप

Tousif Mujawar

कर्नाटकला ऑगस्टमध्ये लसीचे एक कोटी डोस मिळणार: मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

बारावीच्या ऑनलाईन अर्जप्रक्रियेस उद्यापासून सुरुवात

datta jadhav