ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर काँग्रेसचे तीन बड्या नेतेही मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या भेटीमागे नेमकं काय कारण आहे याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवास्थानी भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तीन बड्या नेत्यांनाही वर्ष निवासस्थानावर जाऊन शिंदेंची भेट घेतली. नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) आणि अमिन पटेल (Amin Patel) आदि नेत्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : शिराळा कोर्टाचा राज ठाकरेंना दिलासा नाहीच; गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज नामंजूर
संबंधित काँग्रेस नेते नेमक्या कोणत्या कारणासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण या भेटीदरम्यान शाळेच्या पटसंख्येसंदर्भात सुरु असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हे तीन काँग्रेस नेते आपापल्या मतदार संघाच्या विकास कामांबाबतही मुख्यमंत्र्याच्या भेटीस आल्याचे म्हटले जातेय.