Tarun Bharat

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करणार

Advertisements

CM Eknath Shinde : राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Davakhana) सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या सुविधा मिळणार
-प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार.
-प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत.
-आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी.खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर.-
-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर मिळण्यासाठी मदत.

Related Stories

ड्रग प्रकरण: अभिनेत्री रागिनी, संजना यांचा जामीन अर्ज फेटाळला

Archana Banage

केशकर्तनालय सुरु केल्यास गुन्हा दाखल करणार

Patil_p

पत्नी आणि मुलाकडून बापाची हत्या; सातव्या मजल्यावरून फेकले खाली

Abhijeet Khandekar

सांगली : एसटी कर्मचाऱ्यांना 24 तासाचा अल्टीमेटम; अन्यथा त्यांची सेवासमाप्ती

Abhijeet Khandekar

Ratnagiri : करबुडेत तीनपत्ती जुगारावर पोलिसांची धाड; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

Sangli : नाना पटोले यांच्या विरोधात एमआयएम पक्षाचे पोलिस उपधीक्षकांना निवेदन

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!