Tarun Bharat

वारकऱ्यांसाठी खूशखबर! पंढरपूरला जाणाऱ्यांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे (Pandhrpur) रवाना होत आहेत. आता ह्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी (Toll Free) करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.

लाखो भक्त आणि वारकरी तेथे जाणार आहेत. त्यामुळे येथील आढावा मी घेतलाय. सर्व पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसोबत, विभागीय आयुक्त पुणे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सचिव, अतिरिक्त सचिव यांसोबत चर्चा करण्यात आली. जे अधिकारी दरवर्षी नियोजन करतात, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली. जे वारकरी दिंड्या आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष द्या. ज्या गाड्या आपल्या पंढरपूरला जात आहेत. कोकणात गणपतीला गाड्या जायच्या तेव्हा आपण ज्याप्रकारे स्टीकर देत होतो, तसेच स्टीकर आपण वारकरी सांप्रदायांनी गाडी नंबर आणि नावाची नोंदणी करावी. तसेच ट्रोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना मी सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.”

Related Stories

स्वराविष्कारात रंगला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’

prashant_c

सोलापूर : भाजपाच्या उपोषणाचे झाले क्षणिक आंदोलन

Archana Banage

ब्रिटीशकालिन बोगद्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Patil_p

देशात डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर; ४ महिन्यांच्या उच्चांकावर

Abhijeet Khandekar

”खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

Archana Banage

वाळवा तालुक्यात महिला, युवती कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage