राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली आहे .महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. व्हीसीद्वारे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सरकार बरखास्त होणार का या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, सरकार पूर्णपणे एक ताकदीने चालेल त्या दृष्टिकोनातून कॅबिनेटमध्ये भूमिका घेण्यात येणार आहे. याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असेही ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये कोणतेही सरकार अस्थिर नाही. उध्दव ठाकरे मविआ सोबत राहणार आहेत असं त्यांनी सांगितल आहे. तर मविआ सोबत काॅंग्रस पूर्ण ताकदीने उभा असल्याची सोनिया गांधी यांची भूमिका असल्याचे कमलनाथ यांनी मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करुन सांगितले. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात कोरोनाची एन्ट्री झाली आहे अस माध्यमांना वाटत असेल तर केंद्र सरकारने देशाला कोरोनाग्रस्त करण्यासाठी आणला होता का प्रश्न निर्माण होतो असे पटोले म्हणाले.
दरम्यान कोरोनावरुन मतभेद सुरु आहेत. सत्तासंघर्षात कोरोनावरुन नेत्यांचा गोंधळ सुरु आहे. विजय वडेट्टीवार म्हणतात ठाकरेंना कोरोना नाही, तर पटोले म्हणतात ठाकरेंना कोरोना झाला आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात कोरोनाची एन्ट्री ; राज्यपालानंतर आता उध्दव ठाकरेंना कोरोनाची लागण
Advertisements