ऑनलाईन टीम/तरुण भारत
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज हिंसाचाराचा मुख्य आरोपी जावेद पंपाच्या घरावर बुलडोझरच्या कारवाईवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरन्यायाधीश झाले आहेत. ते स्वत: कुणालातरी त्यांच्या कोर्टात हजर करून घर फोडतील. हिम्मत असेल तर टेनीचे घर फोडा, त्याच्यावर पाच जणांच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, टेनीचा सुप्रीम कोर्टानेही त्यांचा जामीन रद्द केला आहे. ओवेसी म्हणाले, अजय टेनीला काहीही केले नाही. अजयचे घर असेल तर ते पाडले जाणार नाही, फातिमाचे घर असेल तर पाडले जाईल. ते पुढे म्हणाले, यूपीचे मुख्यमंत्री यूपीचे मुख्य सरन्यायाधीश झाले आहेत. कोणाचे घर फोडायचे ते तो ठरवेल. एका समाजाच्या घरांवर बुलडोझर चालवून तुम्ही देशाची राज्यघटना कमकुवत करत आहात. तसेच भारतीय मुस्लिमांना भाजपकडून एकत्रितरित्या शिक्षा दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोर्टाला कुलूप लावा. न्यायाधीशांना कोर्टात येऊ नका असे सांगा, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.
ओवैसी म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सुपर चीफ जस्टिस बनले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात ते कोणालाही दोषी ठरवू शकतात. आफरिन फातिमा यांचे घर त्यांच्या आईच्या नावे आहे. भाजप केंद्रीय मंत्री आशिष मिश्रा यांच्या मुलाचं घर पाडत नाहीत ज्यांनी पाच लोकांचा जीव घेतला आहे. भाजपकडून भारतीय मुस्लिमांना एकत्रितरित्या शिक्षा देत आहे.
दरम्यान, १३ जून रोजी गुजरातमधील कच्छमध्ये एका सभेत ओवेसी म्हणाले होते की, पीएम मोदींना न्यायालयांना टाळे लावण्याचे आवाहन आहे. दोषी कोण हे मुख्यमंत्रीच ठरवतील मग न्यायालयाची काय गरज? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खिल्ली उडवत ते म्हणाले, तुम्ही भारताच्या कायद्याच्या राज्यावर बुलडोझर चालवला आहे, अशी टीका केली होती.
दरम्यान, मोदी सरकारवरही यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारनं ८ वर्षामध्ये १६ कोटी रोजगार द्यायला हवे होते. पण आता ते ५ लाख रोजगाराच्या बाता मारत आहेत. येत्या २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरु आहे. केंद्र सरकारनं ५५ लाख पद भरतींना मंजुरी दिली आहे. पण यांपैकी ते केवळ १० लाख रोजगार देणार आहेत, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.