सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचे आवाहन : सत्तरी सहकार संमेलनात सहकारी संस्थाचा सन्मान
प्रतिनिधी /वाळपई
एकमेकांना सहकार करणे हे सहकार क्षेत्राचा गाभा आहे. सहकार क्षेत्राचा लाभ बहुतांश सर्वसामान्यांना व्हावा या हेतूने सहकारी संस्थांनी काम करून आपला विस्तार वाढवावा. आज सहकार क्षेत्रातील बँकांचे व्याज दर 10 टक्क्मयांपेक्षा जास्त आहे. जर हे व्याज दर 10 टक्क्मयांपेक्षा कमी केल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल. त्यामुळे त्यावर विचार व्हावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
केरी सत्तरी येथे सत्तरी तालुका 4थे सहकार संमेलन पार पाडले. यावेळी उदघाटन मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार डॉ. देविया राणे, केरी ग्रामपंचायत सरपंच दीक्षा गावस, केरी अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावस, सहकार संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष विष्णू पारोडकर, सचिव अनुराधा म्हाळशेकर, पाणी वाटप संस्थचे अध्यक्ष नकुळ राणे, सदस्य नामदेव केरकर, राजू गावस आदी मान्यवर उपस्थित होते. केरी यूथ क्लब येथे सत्तरी सहकार संमेलन समिती आणि केरी अर्बन सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते.
तऊणांनी सहकार क्षेत्रात योगदान द्यावे : डॉ. देवीया राणे
सहकार क्षेत्राद्वारे तरुणांनी विविध व्यवसाय तऊणांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. देविया राणे यांनी केले. यावेळी मेळावली येथील आनंद मेळेकर यांनी राबवलेल्या मधमाशी व्यवसायबद्दल माहिती दिली.
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव
यावेळी मान्यवर मंत्री सुभाष शिरोडकर आणि आमदार डॉ.देवीया राणे यांच्या हस्ते सत्तरी भागात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात उत्कृष्ट महिला सहकारी अनुराधा म्हाळशेकर तर उत्कृष्ट पुऊष सहकारीमध्ये दत्ताराम बर्वे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सेवा पुरवणारी संस्थेमध्ये सत्तरी तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्था वाळपई, उत्कृष्ट व्रेडिट संस्थेमध्ये ए.सी.जी.एल.बी.बी.डी.कर्मचारी सहकारी व्रेडिट संस्था होंडा, उत्कृष्ट अर्बन व्रेडिट संस्थेमध्ये पिसुर्लेतील पिसुर्ले अर्बन व्रेडिट सहकारी संस्था, उत्कृष्ट संसाधन संस्था या गटातून केरीतील समता पाणी वाटप व्यवस्था सहकारी संस्था मर्यादित, उत्कृष्ट दुग्ध उत्पादन संस्थेमध्ये गोवर्धन गोपाळ दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित भुईपाल, मल्टीपर्पज संस्था गटामध्ये पंचगंगा विकास समिती मल्टीपर्पज सहकारी संस्था म्हाऊस यांना प्राप्त झाले.याव्यतिरिक्त वडदेवनगर होंडा येथील धेनू सेल्फ हेल्प ग्रुप, घोटेली – 2 येथील श्री शांतादुर्गा सेल्फ हेल्प ग्रुप,मोर्ले कॉलनी बारावंश सेल्फ हेल्प ग्रुप व पाडेली येथील सातेरी पंचमाया सेल्फ हेल्प ग्रुप यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण गावस तर आभार अनुराधा म्हाळशेकर यांनी केले.