नवी दिल्ली
ऊर्जा मंत्रालयाने कोळसा मंत्रालयाकडून चालू आर्थिक वर्षामध्ये कोल इंडिया लि. आणि सिंगरेनी कोलियरीज कंपनी लि. (एससीसीएल)यांच्या उत्पादनात 10 ते 12 टक्के वाढ करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात विद्युत क्षेत्रासाठी कोल इंडिया आणि एससीसीएलचे उत्पादन कमीत कमी 10 ते 12 टक्क्यांनी वाढविण्यासाठी कोळसा मंत्रालयाकडे आग्रह धरला असल्याची माहिती समोर आली आहे. कोल इंडियाने आर्थिक वर्ष 2021-22साठी विद्युत क्षेत्राला 54 कोटी टन कोळसा उपलब्ध करुन दिला असून एसईसीएल यांनी 5.36 कोटी टन कोळसा उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आहे.