निव्वळ नफा वर्षाच्या आधारे वधारल्याची माहिती
वृत्तसंस्था /मुंबई
खाण क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी कोल इंडियाने 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा हा 6,692.94 कोटी रुपये राहिला आहे. मागील आर्थिक वर्षात समान तिमाहीत 45 टक्के अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष 2021 मधील चौथ्या तिमाहीत हा आकडा 4,586.78 कोटी रुपयावर राहिला होता.
शेअर डिव्हीडेंडची घोषणा
कंपनीने 3 रुपये प्रति समभाग डिव्हीडेंडची घोषणा केली आहे. बाजार बंद झाल्यानंतर या अहवालाची घोषणा केली आहे. कोल इंडियाचे समभाग 1.60 रुपये म्हणजे 0.88 टक्क्यांनी घसरुन तो 180.75 रुपयावर बंद झाला आहे.
महसूल 22.49 टक्क्यांनी वाढला
तिमाहीमधील कामगिरीनंतर महसूल 3,2706.77 कोटी रुपये राहिला आहे. जो एक वर्षाच्या अगोदरच्या समान तिमाहीत 26,700.14 कोटी रुपये म्हणजेच 22.49 टक्के अधिक राहिला आहे.