Tarun Bharat

पुण्यात सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त; नायजेरियन तरुण अटकेत

पुणे / वार्ताहर :

Cocaine worth 2.20 crore seized in Pune नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचे 1 किलो कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी एका नायजेरीयन तरुणाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

अब्दुल अझीज अन्डोई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता व सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांबाबत माहिती काढून कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, शैलजा जानकर व त्यांच्या पथकाला गुरुवारी रात्री, कोंढवा पोलीस ठाण्यातर्गत गस्तीवर असताना मोठय़ा प्रमाणात कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. आरोपी फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई उंड्री, मंतरवाडी परिसरात आर पॉईन्ट सोसायटीच्या समोर हा त्याच्या कारमध्ये बसला होता. दरम्यान, त्याची ओळख पटवून त्याच्यावर पथकाने कारवाई केली. त्याला अटक करून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 2 कोटी 20 लाख आठ हजार रुपयांचे 1 किलो 81 ग्रॅम कोकेन सापडले. पोलिसांनी या कोकेनसह सहा मोबाईल फोन, एक कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले. तसेच आरोपीवर एन. डी. पी. एस. ऍक्ट कलम 8 (क). 21(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वी चतृ:श्रृंगी पोलीस ठाणे येथे कोकेन या अंमली पदार्थाचे तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल असून, नुकताच तो येरवडा कारागृहातून जामीनावर मुक्त झाला होता. तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याच्यावर यापूर्वी कारवाई केली होती.

अधिक वाचा : महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्याची तयारी

Related Stories

राजकीय उदासीनतेमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब

datta jadhav

दादा भुसेंना पालकमंत्रीपदावरून हटवा; भाजप नेत्याची फडणवीसांकडे मागणी

datta jadhav

…मग मुख्यमंत्री कधी उठतात? अजित पवारांचा सवाल

Archana Banage

चंद्रकांत पाटील जगातील सर्व पार्लमेंटच्या जागा जिंकू शकतात ; संजय राऊतांचा खोचक टोला

Archana Banage

कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून व्यावसायिकाचे अपहरण

datta jadhav

दोन महिन्यात बांधकाम पाडा, नाही तर…; सर्वोच्च न्यायालयाचा नारायण राणेंना दणका

Archana Banage