Tarun Bharat

14 ऑक्टोबरला झळकणार ‘कोड नेम’

Advertisements

परिणीति चोप्रा-हार्डी संधूचा चित्रपट

रिभू दासगुप्ताचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कोड नेम : तिरंगा’ 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ऍक्शन आणि थ्रिलने भरपूर या चित्रपटात परिणीति चोप्रा रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. परिणीतिसोबत हार्डी संधू मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात शरद केळकर, दिव्येंदु भट्टाचार्य, सब्यसाची चक्रवर्ती आणि दीश मारीवाला हे कलाकार देखील आहेत. भुवन कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे.

या चित्रपटाचा टीझर अन् पोस्टर सादर करण्यात आले आहे. हा चित्रपट टी-सीरिजकडून निर्मित करण्यात आला आहे. कोड नेमनंतर परिणीति इम्तियाज अलीच्या ‘चमकीला’ आणि टीनु सुरेश देसाईंच्या ‘कॅप्सुल गिल’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. हे दोन्ही चित्रपट नेव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. याचबरोबर ‘ऍनिमल’ या चित्रपटात परिणीति काम करत असून याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत.

हार्डी संधू यापूर्वी ‘83’ या चित्रपटात दिसून आाल आहे. त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता असण्यासह तो लोकप्रिय पंजाबी गायक आहे. पलक तिवारीसोबतचा त्याचा अल्ब ‘बिजली’ला मोठी लोकप्रियता मिळाली होती.

Related Stories

‘झी कॉमेडी शो’ देणार तणावाला मुक्ती

Patil_p

कोरोना विरुद्धच्या लढाईत सुपरस्टार रजनीकांतचा सहभाग; केली 50 लाखांची मदत

Rohan_P

तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार सोनाक्षी सिन्हा

Amit Kulkarni

‘तुझ्यासोबत कुठेही…’ आथियाच्या राहुलला शुभेच्छा

Abhijeet Shinde

फादर्स डेच्या निमित्ताने ‘जून’, ‘प्लॅनेट मराठी’कडून सर्व बाबांना अनोखी भेट

Patil_p

‘ह. म. बने तु. म. बने’ मालिकेला स्वल्पविराम!

Rohan_P
error: Content is protected !!