प्रतिनिधी /पणजी
टिका उत्सवाला गोव्यात थंड प्रतिसाद मिळाला असून काल संपूर्ण दिवसांत राज्यात फक्त 2721 जणांनी कोरोनाचा बुस्टर डोस घेतल्याचे समोर आले आहे. उत्तर गोवा जिल्हय़ात 1317 जणांनी तर दक्षिण गोव्यात 1404 जणांनी हा डोस घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हा डोस घेतला, तथापि राज्य सरकारच्या या डोससाठी जनतेने फारसा प्रतिसाद दिला नाही. किरकोळ संख्येने लोक येत होते मात्र भरघोस पाठिंबा मिळाला नाही. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या 60 वर्षीय किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हा बुस्टर डोस आखण्यात आला होता. परंतु, त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.