180 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू : सोमवारी 70 गाळय़ांचा लिलाव
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायप्रवि÷ गाळे वगळून उर्वरित 180 गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यापैकी 70 गाळय़ांचा लिलाव सोमवारी आयोजित करण्यात आला होता. पण माळमारुती संकुलातील गाळय़ांच्या लिलावास स्थगिती असल्याने दोन गाळय़ांचा लिलाव थांबविण्यात आला. महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेत कोणीच भाग घेतला नसल्याने थंडा प्रतिसाद लाभला.
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. बारा वर्षांचा करार संपुष्टात आल्याने पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने लिलाव प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतर न्यायप्रवि÷ गाळे वगळून 180 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सोमवारी 70 गाळय़ांचा लिलाव आयोजिला होता. यामध्ये महात्मा फुले भाजी मार्केटमधील 61 गाळय़ांचा समावेश आहे. कचेरी रोड, चव्हाट गल्ली, माळमारुती आणि शिवबसवनगर येथील गाळय़ांचा लिलाव करण्यात आला. माळमारुती येथील दोन गाळय़ांचा लिलाव स्थगित ठेवण्यात आला. आठ गाळय़ांसाठी बोली लागली. यामध्ये महात्मा फुले भाजी मार्केटमधील पाच गाळय़ांचा आणि शिवबसवनगर व कचेरी रोड अशा विविध ठिकाणी असलेल्या गाळय़ांचा लिलाव झाला. महात्मा फुले भाजी मार्केट येथील 61 पैकी केवळ 6 गाळय़ांसाठी बोली लागली. उर्वरित गाळे घेण्यासाठी कोणीच सहभागी झाले नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभला.
यावेळी महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, फारुक यड्रावी, बाबू माळन्नावर, महसूल निरीक्षक मलिक गुंडप्पण्णावर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या सभागृहाजवळ गर्दी
महापालिकेच्या गाळे लिलावास अनेक गाळेधारक आक्षेप घेत आहेत. काहींनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे. न्यायप्रवि÷ गाळे वगळून उर्वरित गाळय़ांचा लिलाव महापालिकेने आयोजित केला होता. गाळय़ांचा लिलाव होईल, या धास्तीने न्यायालयात याचिका दाखल केलेले गाळेधारक महापालिकेत दाखल झाले होते. पण त्यांना लिलाव प्रक्रियेवेळी बैठक कक्षात घेण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहाजवळ गर्दी झाली होती.