Tarun Bharat

दक्षिण, मध्य, वायव्य भारतात थंडी जास्त

पुणे / प्रतिनिधी :

येत्या फेबुवारीपर्यंत दक्षिण, मध्य तसेच वायव्य भारतातील काही भागांत किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान थंडी तसेच पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार, फेब्रुवारीपर्यंत मध्य, दक्षिण तसेच वायव्य भारतातील काही भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. त्यामुळे या भागात थंडीचा जोर जास्त असेल. तसेच वायव्य भारतातील काही भाग, पूर्वोत्तर भारतातील काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, मध्य भारतातील बहुतांश भाग, पूर्व, पूर्वोत्तर भारत, वायव्य भागातील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. डिसेंबर महिन्यात दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस हा सरासरीइतका राहील तर देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील.

अधिक वाचा : राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद; सदाभाऊंचे वादग्रस्त विधान

Related Stories

लॉकडाऊन दिल्लीत, संकट अलीगढात

Amit Kulkarni

पश्चिम बंगाल : अधिकारी पिता पुत्रांना केंद्राकडून वाय + सुरक्षा

Archana Banage

प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Tousif Mujawar

पंचायत निवडणुकीदरम्यान युपीत 2000 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

Amit Kulkarni

राहुल गांधींना मिळाली पूजा भट्टची साथ

Patil_p

केरळ सरकारच्या वेतन कपात निर्णयाला स्थगिती

Patil_p