नवी दिल्ली ः
दैनंदिन वापरातील वस्तू बनवणारी कंपनी कोलगेट पामोलिव्ह इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत निव्वळ नफा 3.28 टक्क्यांनी वधारुन तो 278.02 कोटी रुपयांवर पोहोचल्याची नोंद केली आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 269.17 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. मागील तिमाहीत त्यांचे विदेशी चलनातून झालेले उत्पन्न हे देखील 2.56 टक्क्यांनी वधारुन 1,378.37 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 1,343.96 कोटी रुपये होता. या कालावधीत सीपीआयएलचा एकूण खर्च 2.66 टक्क्यांनी वधारुन तो 1,024.62 कोटी रुपये झाला आहे.
चालू आर्थिक वर्ष 2022-23 करीता 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति समभागास 18 रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 489.6 कोटी भागधारकांना हा लाभांश देण्यात येणार आहे.