Tarun Bharat

Kolhapur : रात्री 12 वाजेपर्यंत डीजे बंद करू नका : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश

Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध गणेशोत्सव मंडळांनी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगीचे देण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. गणेश मंडळांच्या या निवेदनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 31 ऑगस्टला रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगी दिली असून त्या संदर्भात आदेश जारी केला आहे. आवाजाची मर्यादा राखून परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे.

कायद्यानुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येईल. यासाठी वेळेमध्ये सुट देण्यात येऊन सकाळी 6 वाजल्यापासुन रात्री 12 वाजेपर्यंत साउंड लावण्याची परवानगी आहे. तथापी कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरामध्ये या आदेशानुसार कोणतीही सुट राहणार नाही. ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे.

दुसरीकडे ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी 14 सुटीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून यानुसार ही सुट देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत घोषित करण्यात आलेल्या दिवसांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

उचगावात पुणे बेंगळूर महामार्गावर ट्रक पलटी; वाहतूक विस्कळीत

Archana Banage

Kolhapur : जिल्हाधिकाऱ्यांना समज द्यावी…अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : चंदूरातील रुग्ण संख्या 76 वर, गाव बनले हॉटस्पॉट

Archana Banage

दिवंगत गणपतराव देशमुख यांना शेकापतर्फे श्रद्धांजली

Archana Banage

विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या दारातच आढावा बैठक घेणार : आमदार आबिटकर

Archana Banage

लता मंगेशकर यांचे पन्हाळा, जोतिबा श्रद्धास्थान, कोडोलीत आर. आर. पाटलांच्या घरी भेट

Archana Banage