वृत्तसंस्था/ माँटेरी, मेक्सिको
अग्रमानांकित डॅनियली कॉलिन्सला येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए 500 टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. मध्यरात्री एक वाजता संपलेल्या या सामन्यात एरिका अँड्रीव्हाने तिला तीन सेट्समध्ये पराभूत केले.
अँड्रीव्हाने हा सामना 1-6, 6-3, 6-3 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. टॉप 20 मधील खेळाडूला हरविण्याची अँड्रीव्हाची ही पहिलीच वेळ आहे. अन्य सामन्यात सहाव्या मानांकित लिंडा नोस्कोव्हाने केवळ एक गेम गमवित कझाकच्या अॅना डॅनिलिनाचा 6-0, 6-1 असा धुव्वा उडविला. लिंडाची पुढील लढत चीनची वांग झियु किंवा जर्मनीची ताताना मारिया यापैकी एकीशी होईल. ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेल्या विद्यमान विजेत्या डोना व्हेकिकने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.