अपघातातील डंपरमध्ये वाळू
मालवण / प्रतिनिधी
Colombo villagers aggressive; about fifteen dumpers stopped!
कोळंब गावातील काल झालेल्या डंपर अपघातातील डंपरच्या हौद्यात वाळू सापडून आल्याने ग्रामस्थ अधिकच आज आक्रमक बनले होते. ग्रामस्थांनी आज सकाळी कोळम वरून सुरू असलेले वाळू वाहतूक करणारे डंपर रोखले सुमारे दहा ते पंधरा डंपर ग्रामस्थांनी रोखून धरले होते. कालच्या अपघातातील डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्याचे मान्य करूनही आपला शब्द पाळला नसल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक बनले होते. कोळंब गावातून पूर्णपणे डंपर वाहतूक बंद करण्याची एकमुखी मागणी आज ग्रामस्थांनी लावून धरली होती. दरम्यान डंपर व्यवसायिकांच्या वतीने आज ग्रामस्थांची काही जणांनी चर्चा केली. मात्र, त्यातूनही तोडगा निघाला न होता. प्रशासनाने रस्त्यावर गतिरोधक आणि डंपर चालक मालकाने आपल्या गाडीवरील चालकांना कमी वेग ठेवून गाडी चालवण्याच्या सूचना करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. सकाळी 11 नंतर सुरू झालेले आंदोलन सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.