Tarun Bharat

रंग बदलती चिडियाँ

Advertisements

माणसाने वैज्ञानिक संशोधनाच्या जोरावर अचाट प्रगती केली आहे. असंख्य अशा वस्तू त्याने तयार केल्या आहेत की ज्यांची कल्पनाही करता येणे शक्य होणार नाही. असे असले तरी निसर्गामध्ये जी सुंदरता दिसून येते, त्याला मानवाची कुठलीही निर्मिती तोड ठरू शकत नाही. निसर्गाची विविधता हा मानवासाठी नेहमीच एक गूढ आणि आव्हानात्मक विषय राहिला आहे. ही विविधता जाणून घेण्याचा आणि तिची नोंद ठेवण्याचा प्रयत्न मानव गेल्या हजारो वर्षांपासून करीत आहे. तथापि, प्रत्येक वेळी त्याला नव्या नव्या विविधतेचा अनुभव येत असतो.

वाईल्ड लाईफ व्हायरल सिरिज अंतर्गत निसर्गाचे हे चमत्कार आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. नुकताच एका वैचित्र्यपूर्ण पक्ष्याचा शोध लागला असून हा पक्षी दर सेकंदाला आपला रंग बदलताना दिसून येतो. ट्विटरच्या ‘वंडर ऑफ सायन्स’वर या पक्ष्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. हा हमिंगबर्ड जातीचा पक्षी असून तो अल्पावधीत इतके रंग बदलताना दिसतो, की आपल्याला तो खरा पक्षी आहे किंवा नाही, याचा संभ्रम पडतो. हा नैसर्गिक पक्षी नसून संगणकावर कृत्रिमरीत्या तयार केलेली आभासी प्रतिमा आहे की काय? असे वाटल्यावाचून राहात नाही, असे अनेक दर्शक म्हणतात. तथापि, हा पक्षी खरोखरच अस्तित्वात असून काही दिवसांपूर्वीच त्याला कॅमेऱयात पकडण्यात आले आहे. रंग बदलण्याची त्याची ही क्षमता खरोखरच आश्चर्यचकित करून सोडणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षावधी लोकांनी शेअर केला असून अनेक जण परमेश्वराची ही लीला पाहून भारावलेले दिसून येतात. अत्युच्च प्रतीच्या मानवी संशोधनालाही निसर्गान मात दिली आहे, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली आहे.

Related Stories

ऊंट गाडीवर पहिली मोबाइल लायब्रेरी

Amit Kulkarni

पाळीव श्वानासाठी 5 कोटीची चेन

Patil_p

नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; ‘कवरत्ती’ युद्धनौका ताफ्यात

Rohan_P

शहराच्या तुलनेत गावातील मधमाशी अधिक मेहनती

Amit Kulkarni

निसर्गाचा चमत्कार ठरले श्रद्धेचे केंद्र

Patil_p

चांदीची शाई असणारे पेन

Patil_p
error: Content is protected !!