वार्ताहर /किणये
खादरवाडी येथील संत तुकाराम महाराज मंदिराचा कॉलमभरणी समारंभ नुकताच झाला. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थ व वारकऱयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
अभियंता रोहित पाटील यांच्या हस्ते कॉलमभरणी पूजन करून सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला. हभप नामदेव बस्तवाडकर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. बसवंत गोरल यांच्या हस्ते तुळशी पूजन करण्यात आले. निवृत्त सैनिक अशोक डोळेकर यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.
गावातील वारकऱयांनी भजन कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला शंकर नेसरकर, मारुती पाटील, मनोहर पाटील, कमळाबाई गोरल, जायाप्पा गोरल, आनंद बस्तवाडकर, निंगाप्पा गोरल, देवाप्पा गोरल, प्रकाश पिंगट, पुंडलिक पाटील, भुजंग नेसरकर आदींसह वारकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष परशराम गोरल यांनी केले तर उपाध्यक्ष यल्लाप्पा यळ्ळूरकर यांनी आभार मानले.