Tarun Bharat

स्वतःसाठी खोके तर शेतकऱ्यांना धोके देणारे हे सरकार आहे; आ. आदित्य ठाकरे

ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा : संगेवाडी व मांजरी येथे आ. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद : सांगोला : आ. आदित्य ठाकरे यांनी संगेवाडी व मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.

प्रतिनिधी / सांगोला

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सगळीकडेच नुकसान झाले आहे. राज्यातील मंत्री अथवा आमदार अजूनही शेतकऱयांच्या बांधावर गेले नाहीत. या सरकारला शेतकऱयांसाठी अजूनही वेळ मिळाला नाही. सत्ताधाऱयांचे सध्या केवळ राजकारण सुरू आहे याचे मला दुःख वाटते. ते सर्वजण स्वतःसाठी खोके मात्र जनतेसाठी फक्त धोके देत असल्याचे सांगितले. मला शेतीतले काही कळत नसले तरी तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मी येथे बांधावर आलोय, असे आ. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

माजी पर्यटनमंत्री व शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी संगेवाडी व मांजरी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

आमदार आदित्य ठाकरे यांनी संगेवाडी येथील उत्तम शिंदे या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच इतर शेतकऱयांची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱयांना धीर देण्याचे काम केले. शेतकऱयांचे सरसकट पंचनामे करावेत असे सांगितले. तर मांजरी येथे शेतकऱयांशी संवाद साधताना सुरुवातीला आपण सगळे ओके आहात का असे विचारले असता शेतकऱयांमधून साहेब वाईट अवस्था आहे. डोंगर झाडी कशी आहे असे विचारले असता ठाकरे यांनी अशा गद्दारांचे नाव काढू नका, मी त्यांना किंमतही देत नाही, असे सांगून आ. शहाजीबापू पाटील यांचा नामोल्लेख टाळला.
माजी आ. कै. गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघाचे नाव खूप मोठे केले होते. ते नाव याचं तालुक्मयातील माणसामुळे धुळीस मिळाले आहे. या भागातील जनता अशा गद्दारांना येणाऱया काळात कधीही माफ करणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना नेते लक्ष्मण हाके, युवा सेना विस्तारक उत्तम ऐवळे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब यांच्यासह शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवारातील सर्व शेतकऱयांचे पंचनामे करावेत व सरसकट शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. ठाकरे यांनी मला तुमचे प्रश्न समजले आहेत, निवेदनेही मिळाली आहेत. ते प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संगेवाडी, मांजरी येथे मोठा जनसमुदाय दिसून आला.

आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकरी सहकारी सूतगिरणी येथे जाऊन माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सांगोल्याचे नाव धुळीस मिळवले
माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघाचे नाव मोठे करून नावलौकिक मिळवला. पण याच भागातील एका व्यक्तीमुळे सांगोल्याचे नाव पार धुळीस मिळवले. अशा गद्दार आमदाराला जनता कधीही माफ करणार नाही.


बंधारा खेकड्य़ामुळे तर पाझरत नाही ना
आदित्य ठाकरे यांनी शेतकऱयांशी संवाद साधताना पन्नास खोके… असे म्हटले असता जमावातून …एकदम ओके… एकदम ओके… असे दोन तीनदा म्हणण्यात आले. एका शेतकऱयाने माण नदीपात्रातील बंधारा पाझरत असल्याचे सांगितले असता आदित्य ठाकरे यांनी हा बंधारा खेकडय़ामुळे तर पाझरत नाही ना असा प्रश्न विचारला.

Related Stories

कोल्हापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २१२ कोटींच्या प्रशासकीय व वित्तीय मान्यता- पालकमंत्री

Abhijeet Khandekar

बिहार : एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या

Tousif Mujawar

कोल्हापूरात ओमिक्रॉनचे आणखीन तीन रूग्ण

Abhijeet Khandekar

सोलापूर विद्यापीठाच्या लोकल टू ग्लोबल शिक्षणाची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल !

Archana Banage

यंदाचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

Abhijeet Khandekar

कोरेगावात भरधाव ट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार

Patil_p