Tarun Bharat

कॉमेडियन राजू श्रीवास्तवब्रेनडेड स्थितीत : प्रकृती चिंताजनक

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, मात्र त्यानंतर सुधारत होती. तथापि, गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी श्रीवास्तव यांचा मेंदू काम करत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर ताज्या वैद्यकीय अहवालानुसार प्रकृती चिंताजनक असून ते सध्या बेनडेड स्थितीत असल्याचे निकटवर्तियांकडून सांगण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्याविषयीची ही बातमी समोर आल्यानंतर त्यांचे अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टर सतत प्रयत्नशील आहेत.  त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजूला रुग्णालयात दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 10 ऑगस्ट श्रीवास्तव जिममध्ये वर्कआउट करत असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

Related Stories

कोरोनाने मृत्यू झाल्यास किमान 1800 रुपये पेन्शन

Patil_p

उत्तराखंडमध्ये 17,500 कोटींच्या प्रकल्पांचा पंतप्रधानांकडून शुभारंभ

Amit Kulkarni

आंध्रमध्ये वायू गळती, 11 बळी

Patil_p

‘मॉडर्ना’ लवकरच भारतीय मैदानात

datta jadhav

वाऱयाने ब्रिज पडल्याचे ऐकून नितीन गडकरी गार

Patil_p

दिल्लीत चिनी महिलेला अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!