Tarun Bharat

विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

Advertisements

दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकप्रिय विनोदवीर राजू श्रीवास्तव यांची बुधवारी प्रकृती बिघडली आहे. श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये वर्कआउट करताना श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचे बंधू आणि तसेच पीआरओने याची पुष्टी दिली आहे. ट्रेडमिलवर रनिंग करताना छातीत वेदना सुरू झाल्या आणि ते खाली कोसळल्याचे सांगण्यात आले. राजू श्रीवास्तव हे दोन भावांना तसेच मित्रांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यांची प्रकृती आता ठीक असून लवकरच यासंबंधीचा तपशील जाहीर केला जाणार असल्याचे पीआरओकडून सांगण्यात आले. श्रीवास्तव यांनी अनेक चित्रपट आणि कॉमेडी शोंमध्ये काम केले आहे.

Related Stories

विध्वंसक ड्रोनचे तंत्रज्ञान चीनच्या हाती

Patil_p

हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

4 गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लटकविणार?

Patil_p

अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

बाहुबली हरिशंकर तिवारींच्या कुटुंबाचा सपप्रवेश

Patil_p

तृणमूल नेत्याची गोळय़ा घालून हत्या

Patil_p
error: Content is protected !!