सावंतवाडी / प्रतिनिधी
Commencement of Bhoomi Pujan of District Purna Primary School Nemale No.1 Rangam
जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं.१ च्या रंगमंच्या च्या भूमिपूजनाचा शुभारंभ नेमळे ग्रामपंचायत सरपंचा सौ.दिपिका भैरे यांच्या हस्ते करण्यात आला.हा रंगमंच मा.जि.प.सदस्य उत्तम पांढरे यांच्या स्वखर्च निधी मधुन मंजूर झाला आहे .या रंगमंच्या साठी या शाळेचा माझी विद्यार्थी श्री. देवेंद्र तारक परब यानी प्रयत्न केले होते .यावेळी नेमळे सरपंचा दिपिका भैरे यांनी मा.जि.प.सदस्य श्री. उत्तम पांढरे व श्री. देवेंद्र परब यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नेमळे हायस्कूल चे अध्यक्ष आ.भि.राऊळ,जि.प.पु.प्रा.शाळा नेमळे नं.१च्या शिक्षिका सौ.सिमा मोरजकर,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अर्जुन राऊळ ,शिक्षक पालक समिती चे उपाध्यक्ष..देवेंद्र तारक परब. माजी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शंकर( दाजी) राऊळ,या शाळेचे माझी विद्यार्थी व शिक्षक .उत्तम राऊळ सर ,. सचिन मुळीक , सामाजिक कार्यकर्ते .दिलीप भैरे ,सावंतवाडी आर्य दूर्गा संस्थेचे अध्यक्ष. श्री इंगळे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.