सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
आवेडे-बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या श्री साईबाबा मंदिर मूर्तीप्रतिष्ठापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळय़ाला रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली. मंगळवारपर्यंत हा सोहळा चालणार आहे.
रविवारी सकाळी धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे काकड आरत्या, सकाळी श्रीफळ समर्पण, महाभिषेक, दुपारी ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात साईजप, देवता स्थापना आदी धार्मिक विधी पार पाडले. दुपारी महाआरत्या व नैवेद्य झाला. महाआरतीचा मान उमेश बोरकर व हेमा बोरकर यांना लाभला. सौ. विंदा सावंत व गोविंद सावंत यांनी महाप्रसाद सेवा अर्पण केली. भाविकांनी मोठय़ासंखेने उपस्थिती लावून साईबाबांचे दर्शन घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रायकर, सौ. ज्योत्स्ना रायकर, अक्षय नाईक, मुकेश नाईक, गुरुदास नाईक, श्रीकांत नाईक, देऊ नाईक, गोकुळदास नाईक, नारायण नाईक, आनंद तिमणो नाईक, वासुदेव नाईक, उमेश नाईक, रघू नाईक, सुभाष बाबया नाईक, रमाकांत बोरकर, राया नाईक, शशी नाईक, गणेश नाईक आदी उपस्थित होते. रात्री साईबाबांची पालखी मिरवणूक व त्यानंतर ‘रणक्षेत्र’ ही राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा घेण्यात आली.