Tarun Bharat

बाळेकुंद्री खुर्द येथील चौंडेश्वरीदेवीच्या यात्रेला प्रारंभ

वार्ताहर /सांबरा

बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता व परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री चौंडेश्वरीदेवीच्या यात्रेला शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

प्रारंभी पहाटे मंदिरात अभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर  पुजा-अर्चा, ओटी भरणे आदी कार्यक्रम पार पडले. दरम्यान, दिवसभरात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होती.  सायंकाळी माजी आमदार संजय पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले, भाजपाचे बेळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, निलजी ग्रामपंचायत सदस्य मधू मोदगेकर आदींनी भेट दिली. यावेळी संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले की, येथील श्री चौंडेश्वरी देवीचे मंदिर हे पुरातन काळातील असून म्हैसूर येथील चामुंडेश्वरी देवीचा अवतार म्हणून या देवीला ओळखले जाते. त्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

आर. एन. चौगुले, युवराज जाधव आदींची भाषणे झाली. रात्री बारा वाजता गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला. शनिवार दि. 10 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.

Related Stories

जुना धारवाड रोड बनला मृत्यूचा सापळा

Amit Kulkarni

श्रीराम मंदिरासाठी खानापुरात आज 8 विभागात निधी संकलन

Amit Kulkarni

देवेगौडांचा नातू सूरज येणार राजकारणात

Abhijeet Khandekar

मांगिरीश नरेंद्र देशपांडे यांना डॉक्टरेट प्रदान

Amit Kulkarni

रेल्वे मार्गाच्या बाजूने संरक्षक भिंतीचे बांधकाम

Amit Kulkarni

गाळय़ांची सुनावणी 28 पर्यंत लांबणीवर

Amit Kulkarni