283 बुद्धिबळपटूंचा सहभाग, 12 सीडेड खेळाडूंचा समावेश
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित गंगाधरय्या सालीमठ स्मृती विविध गटात व खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ झाला.
आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित गंगाधरय्या सालीमठ स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीडीसीएचे संस्थापक सभासद प्रकाश कुलकर्णी, बीडीसीएचे माजी अध्यक्ष सुरेश देसाई, बीडीसीएचे अध्यक्ष निलेश भंडारकर, सचिव गिरीश बाचीकर, उपाध्यक्ष डी. डी. राव आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 283 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असून त्यामध्ये 12 सीडेड) खेळाडूंचा सहभाग आहे. पाहुण्यांच्या हस्ते बुद्धिबळ सोंगटय़ाची चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सदर स्पर्धा स्विस पद्धतीने साखळी व बाद पद्धतीच्या स्पर्धेला प्रारंभ झाला. ही स्पर्धा खुला गट, 8 वर्षाखालील, 12 वर्षाखालील व 16 वर्षाखालील अशा विविध गटातील स्पर्धेला प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱया या स्पर्धेत आज अंतिम फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.